मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी थेट मार्केटिंगवर मोफत कार्यशाळा

रत्नागिरी : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषि महाविदद्यालय मांडकी – पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील शेतकयांसाठी सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या थेट मार्केटिंगसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कार्यशाळेत ‘मार्केट मिर्ची’ या मोबाईल अ‍ॅप द्वारे उपस्थित शेतकऱ्यांना स्वउत्पादित आणि प्रक्रिया केलेल्या शेती उत्पादनांचे या अ‍ॅप मार्फत विस्तृत प्रमाणात बहुसंख्य ग्राहकापर्यंत पोहचवणे सुलभ होईल तसेच या अ‍ॅपच्या संचालिका प्रगती गोखले यांनी कृषि मधील डिजिटल मार्केटिंगचे महत्व आणि भविष्यात शेतकयांना आपल्या शेतातून आपला शेतीमाल ग्राहकापर्यंत पोहचवून जास्तीत जास्त नफा व वेळेची बचत कशी करता येईल यावर मार्गदर्शन करून, या अ‍ॅप चा वापर कसा करायचा याचे पूर्ण प्रात्यक्षित दाखवून जवळपास २६ प्रकारच्या शेतीमालांची विक्री कशी करू शकतो याचे एकदम सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती गोखले तसेच श्रीम.अय्यर, श्री. सबनीस, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्‌यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषि महाविद्‌यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, डॉ. पांडुरंग मोहिते सर्व प्राध्यापक व विदयार्थी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE