रत्नागिरी, दि.23 : राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे होणार आहे. नाट्यप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 24 नोव्हेंबरपासून राज्यातील विविध 24 जिल्हास्तरावरील केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरिता विविध उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची गौरवसंपन्न 62 वर्षे अविरत वाटचाल चालू आहे. ज्याद्वारे अनेक नाटककार अभिनेते, तंत्रज्ञ व दिग्दर्शक निर्माण झाले आहेत. त्यांनी नवनवीन प्रयोग करुन या उपक्रमास व मराठी रंगभूमीस समृध्द करुन वैश्विक स्तर प्राप्त करुन दिला आहे.
या स्पर्धेमध्ये सादर होणारी नाटके पुढीलप्रमाणे आहेत.
मंगळवार 26 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजता आजीचा बॉयफ्रेंड, बुधवार 27 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजता मॉर्फोसिस, गुरुवार 28 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजता अखेरचा सवाल, शुक्रवार 29 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजता रुक्ष. शनिवार 30 नोव्हेंबर सायंकाळी 7 वाजता जब वी मेट. रविवार 1 डिसेंबर सायंकाळी 7 वाजता महानायक. सोमवार 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता चांदणी, मंगळवार 3 डिसेंबर सायंकाळी 7 वाजता कडीपत्ता. बुधवार 4 डिसेंबर सायंकाळी 7 वाजता स्वप्नपक्षी
