रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित हरियाणा तायक्वांदो असोसिएशन यांच्यावतीने दि. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत पंचकुला स्टेडियम हरियाणा येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील दोघांची निवड झाली आहे.

जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यामधून युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर, साळवी स्टॉप येथे तायक्वांदोचे प्रशिक्षण घेणारे मंथन पांडुरंग आंबेकर व सार्थक भावेश गमरे या दोन खेळाडूंनी राज्य स्पर्धेत सुवर्णपदक संपादन करून हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेकरिता दि. 26 रोजी पुणे येथून महाराष्ट्र संघ रवाना होत आहे.
संघाचे प्रशिक्षक म्हणून महिला प्रशिक्षिका सौ शशिरेखा कररा या काम पाहणार आहे निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे व प्रशिक्षकाचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांची मेहनत त्यामुळे या संपादन करू शकलो, असे प्रतिक्रिया निवड झालेल्या खेळाडूंनी व्यक्त केली.
