महायुती सरकारच्या शपथविधीनंतर रत्नागिरी, राजापूरमध्ये जल्लोष

रत्नागिरी : नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या  अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी महायुती सरकारचा शपथविधी  सोहळा पार पडल्यानंतर राजापूर तसेच रत्नागिरीमध्ये महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

रत्नागिरीतून सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदार उदय सामंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली तर दापोली मंडणगडमधून दुसऱ्यांदा विधानसभा सदस्यपदी निवडून आलेल्या योगेश कदम यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यांनी देखील नागपूरमध्ये राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या शपथविधी सोहळ्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

कणकवलीतून निवडून आलेले आमदार नितेश राणे यांनी देखील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर रविवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर रत्नागिरीत आमदार उदय सामंत यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आमदार उदय सामंत हे सलग चौथ्यांदा मंत्री बनल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE