कोकण रेल्वे मार्गावर धावणार आणखी एक नवीन विशेष गाडी

  • रीवा ते मडगाव साप्ताहिक स्पेशल म्हणून २२ डिसेंबरपासून धावणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी मध्यप्रदेशमधील रीवा ते गोव्यातील मडगाव दरम्यान विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. दि. 22 डिसेंबर 2024 रोजी विशेष गाडीची पहिली फेरी सुटेल. मध्यप्रदेशमधील जबलपूर ते कोईमतुर अशी या आधीपासूनच एक विशेष गाडी कोकण रेल्वे मार्गे धावत आहेत.

या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्र. ०१७०३ / ०१७०४ रीवा – मडगाव जंक्शन – रीवा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल:
गाडी क्र. ०१७०३ रीवा – मडगाव जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल: रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी रीवा येथून दुपारी १२:०० वाजता प्रस्थान करेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९:२५ वाजता थिवीम (गोवा ) येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०१७०४ मडगाव जंक्शन – रीवा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल: सोमवार दिनांक २३/१२/२०२४ ते ३०/१२/२०२४ रोजी रात्री १०:२५ वाजता मडगाव जंक्शन येथून प्रस्थान करेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ८:२० वाजता रीवा येथे पोहोचेल.
ही गाडी सतना, मैहर, कटनी, जबलपूर जंक्शन, नरसिंहपूर, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खंडवा जंक्शन, भुसावळ, जळगाव, मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, काणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कार्ली स्टेशनवर थांबेल.
रचना: एकूण २४ कोच = संयुक्त (प्रथम एसी + सेकंड एसी) – १ कोच, सेकंड एसी – १ कोच, तिसरा एसी – ५ कोच, स्लीपर – ११ कोच, सामान्य – ४ कोच, एसएलआर – २.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE