उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पाणदिवे येथील रहिवासी सुमन शिवाजी केदारी (६५) यांचे गुरवारी १२/१२/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. सुमन केदारी या सर्वांच्या सुख दुःखात नेहमी धावून जायच्या. प्रेमळ व मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. पती,४ मुले, ५ नाती असा त्यांचा कुटुंब परिवार आहे.
सुमन केदारी यांच्या मृत्यूने केदारी परिवार व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. सुमन केदारी यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २१/१२/२०२४ रोजी श्री माणकेश्वर- उरण येथे संपन्न झाला. दि. २४/१२/२०२४ रोजी तेरावा विधी त्यांच्या राहत्या घरी पाणदिवे येथे संपन्न होणार आहे.
या दुःखद प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
