उरण शहरातील रहिवासी इमारतीला आग

  • आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही

उरण ( विठ्ठल ममताबादे )  : उरण शहरातील एका रहिवासी इमारतीला आग लागण्याची घटना गुरुवारी ( दि. २६) दुपारच्या सत्रात घडली आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले. ही आग ही घरातील स्वयंपाक घरात जेवण सुरू असताना खिडकीच्या कपड्याला लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र आग लागलेल्या रहिवाशांच्या इमारतीत पारसिक बँक असल्याने ग्राहकांची रहिवाशांची एकच धावपळ उडाली होती.सदर आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

उरण तालुक्यात गोदामांना, भंगाराच्या दुकानाना, चालत्या वाहनाना आगी लागल्याच्या घटना या अगोदर वारंवार घडल्याने रहिवासी हे आजही भिंतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.त्यातच उरण शहरातील एका रहिवासी इमारतीला आग लागण्याची घटना गुरुवारी ( दि२६) दुपारच्या सत्रात घडली.

या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले.सदर आग ही घरातील स्वयंपाक घरात जेवण सुरू असताना खिडकीच्या कपड्याला लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र आग लागलेल्या रहिवाशांच्या इमारतीत पारसिक बँक असल्याने ग्राहकांची रहिवाशांची एकच धावपळ उडाली होती.

या आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगितले जात आहे.आगीवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE