ना. उदय सामंत यांनी पुणे येथील बैठकीत घेतला मराठी भाषा विभागाचा आढावा

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये  मराठी भाषा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्याचे उद्योग तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध मुद्यांवर ना सामंत यांनी  संवाद साधला. 

बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली

  • महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार मराठी भाषेचा वापर प्रशासकीय कामकाजात करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
  • प्रशासनात राजभाषेचा सक्षमपणे वापर व्हावा याकरीता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • कार्यालयीन अधिकारी / कर्मचारी यांचेकरीता मराठी व हिंदी भाषा परीक्षा नियमांची अंमलबजावणी करणे.
  • मराठी भाषेचा प्रचार व प्रसार याकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
  • मराठी भाषेतील साहित्य निर्मितीला उत्तेजन देणे.
  • मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करणे.
  • केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्रीय कार्यालयांना मराठी वापराबाबत सूचना देणे.
  • विधानमंडळाच्या मराठी भाषा समितीच्या शिफारशींनुसार मराठी भाषेच्या वापरासंबंधात विविध कार्यालयांमध्ये 2 समन्वय साधणे
  • या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE