क्रॉसकंट्री स्पर्धेत श्रावणी केणी हिची राज्यस्तरावर निवड

उरण (विठ्ठल ममताबादे ) : अलिबाग येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत कु. श्रावणी किरण केणी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.पुढे अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी श्रावणी केणी हिची निवड झाल्याने सर्वच स्तरातून तिच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांची श्रावणी ही मुलगी आहे. या यशा बद्दल श्रावणीच्या यशात महत्वाचा वाटा असलेल्या आई वडिलांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE