रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा : खासदार सुनील तटकरे

  • रत्नागिरीत संसदीय रस्ता सुरक्षा समिती बैठक रस्ते


रत्नागिरी, दि. 2  : रस्ते अपघात कमी करण्यासाठी समाज प्रबोधन, समुपदेशन यासह युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी सूचना खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.


संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज झाली. बैठकीला खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते.
खासदार श्री. तटकरे म्हणाले, अपूर्ण रस्तांची कामे मर्यादित वेळेत पूर्ण झाली तर काही प्रमाणात अपघातांची संख्या कमी होण्यास मदत मिळेल. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासन अथवा केंद्र शासन यांच्याकडून जे अपेक्षित असेल ते अधिकाऱ्यांनी सांगावे, त्याचा पाठपुरावा केला जाईल. या नव्या वर्षात अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आपण जबाबदारीने सर्वांने मिळून प्रयत्न करु या.
खासदार श्री. राणे म्हणाले, अपघात कमी कसे करता येतील, त्यावर उपाय काय, अपघाताचे कारण काय, असे अपघात पुढे होऊ नये याबाबत अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन कर्पे यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा अभियान 2025 च्या अनुषंगाने वाहतूक नियमांची माहिती असणाऱ्या चिन्हांची व वाहतुकीस उपयुक्त असणाऱ्या माहिती पत्रकाचे उपस्थितीतांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE