रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे पार पडली. या स्पर्धेकरीता जिल्हाभरातून सुमारे 700 खेळाडूनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये एस आर के तायक्वांदो क्लबची खेळाडू आणी सुवर्णकन्या स्वरा विकास साखळकर हिने या स्पर्धेत विशेष ठसा उमटविला.
क्युरोगी प्रकारामध्ये अंडर 37 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक मिळवले, तर 148 सेमी या उंचीच्या गटातही तीने ही घोडदौड चालू ठेवून दुसरे सुवर्णपदक जिंकले.
पुमसे ठरला लक्षवेधी
कॅडेट गटामध्ये झालेल्या फ्री स्टाईल पुमसे प्रकारातही स्वराने केलेल्या पुमसेने पंच,प्रशिक्षक, पालकवर्ग, आणि खेळाडूं यांचे लक्ष वेधून घेतले, या स्पर्धेतील पुमसेचा सर्वोच्च 5.7.8 या स्कोरची नोंद करत स्पर्धेतील वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
या स्पर्धेसाठी स्वरा हिला SRK तायकॉन्डो क्लब चे मुख्य प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मार्गदर्शन लाभले, स्वराही ही इयत्ता सहावी मध्ये शिकत असून दामले शाळेची विद्यार्थिनी आहे तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तीच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
