- अमरावती येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकावला पाचवा क्रमांक
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली येथील स्पंदन धामणे याने राज्यस्तरावरील बालैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात पाचवा क्रमांक पटकावला. कोणतेही प्रदूषण न करता रॉकेट लॉन्चिंग करणे शक्य होईल, तसेच एका दिवसात अनेक लॉन्चिंग शक्य होतील. पारंपरिक रॉकेट लॉन्चिंग पद्धतीला पर्याय ठरणारे ‘घूमर द स्पिन अँड जर्क लाँचर’ हे विज्ञान मॉडेल स्पंदनने या प्रदर्शनात मांडले होते.
स्पंदन सध्या खेड येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकत असून त्याने या शाळेचे नेतृत्व केले होते.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, विभागीय शिक्षण उसंचालक – अमरावती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, शिक्षण विभाग यांच्यावतीने हे प्रदर्शन झाले. अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था-अमरावती द्वारा संचलित विज्ञान महाविद्यालय येथे हे ५२ वे राज्यस्तरीय बालैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन झाले.

