रत्नागिरी : होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या तपशील खालीलप्रमाणे :
गाडी क्रमांक 01063/01064 लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक विशेष:
- गाडी क्रमांक 01063 लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम उत्तर साप्ताहिक विशेष: ही गाडी लोकमान्य टिळक (टर्मिनस) येथून गुरुवार, 06/03/2025 आणि 13/03/2025 रोजी 16:00 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी 22:45 वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01064 तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक विशेष: ही गाडी तिरुवनंतपुरम उत्तर येथून शनिवार, 08/03/2025 आणि 15/03/2025 रोजी 16:20 वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी 00:45 वाजता लोकमान्य टिळक (टर्मिनस) येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे:
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जंक्शन, त्रिशूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिकारा, कायंकुलम आणि कोल्लम जंक्शन स्थानकांवर थांबेल.
गाडीची रचना
एकूण 22 एलएचबी डबे: टू टायर एसी – 01 डबा, थ्री टायर एसी – 06 डबे, स्लीपर – 09 डबे, जनरल – 04 डबे, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
