- तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन एक्झाम उत्तीर्ण
रत्नागिरी : अभ्युदय नगर, नाचणे रोड येथील संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील पाच खेळाडूंनी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तम यश संपादन केले.
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन या अधिकृत जिल्हा संघटनेचा वतीने युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी आयोजित केलेली ही परीक्षा साई मंदिर गोडाऊन स्टॉप नाचणे येथे घेण्यात आली. या कलर बेल्ट परीक्षे मध्ये अभ्युदय नगर येथील संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थी सहभागी झाले होते. दुर्वा रोहन कवितके, शिवाज्ञा शुभम पवार, उत्कर्ष नीरज जैन, शौर्य सुनील घाणेकर, नायशा मयूर कांबळे हे पाच खेळाडू यलो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पत्रकार आणि क्रीडाप्रेमी दीपक मोहिते यांच्या हस्ते या मुलांना बेल्ट वितरण करण्यात आले.

अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृह या ठिकाणी प्रशिक्षक संकेता संदेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू तायक्वांदो या खेळाचे प्रशिक्षण घेत असून नुकतीच त्यांनी ही परीक्षा उत्तम प्रकारे पूर्ण करत हे यश संपादन केलं आहे. यावेळी उपस्थित मान्यवर डॉ. मयूर कांबळे, पत्रकार आणि क्रीडाप्रेमी दीपक मोहिते यांनी तसेच सर्व पालकानी या मुलांचं अभिनंदन केलं. राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तसेच परीक्षेचे निरीक्षक व्यंकटेश्वरराव कररा, सचिव लक्ष्मण कररा, यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले
