मुंबईत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजसंस्थानतर्फे शाळांना संगणक, दप्तरांचे वाटप

मुंबई : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने मुबईतील शाळा आणि विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर व दप्तरांचे वाटप करण्यात आले. २ मार्च,२०२५ रोजी मुंबई घाटकोपरमधील पंतनगर येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा झाला.

यावेळी हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत मुंबईतील विविध शाळांना १० संगणक, २ प्रोजेक्टर आणि ८० गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.
संस्थानाच्या मदतीमुळे या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाच्या साथीने शिक्षण घेणे शक्य होणार आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची आवश्यकता आहे; ही नेमकी गरज ओळखून संस्थानाने केलेल्या या मदती बद्दल या शाळांनी आभार मानले आहेत.


या सोहळ्यामध्ये ज्या शाळांना संगणक आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले त्यामध्ये परेल मधील राष्ट्रीय शिक्षण संशोधन संस्था,मालाड येथील प्रबोधन विद्यानिकेतन ,शारदा नाईट हायस्कूल व जुनिअर कॉलेज विक्रोळी, नॅशनल प्राथमिक शाळा घाटकोपर, सुभाषचंद्र बोस विद्यामंदिर मानखुर्द, भैरव विद्यालय घाटकोपर, रमाई हायस्कूल घाटकोपर, तसेच विक्रोळीतील धर्मवीर संभाजी विद्यालय या शाळांना ही मदत देण्यात आली. ती स्वीकारण्यास या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, निवडक विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थानच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत वेळोवेळी अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मदत केली जाते.
संगणक तसेच प्रोजेक्टरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी आजच्या तंत्रज्ञानाला अनुसरून आनंददायी शिक्षण घ्यावे व स्वतःची प्रगती साधावी यासाठी ही मदत करण्यात आली आहे.
यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश भाई मेहता यांनी संस्थांतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवसेना (उबाठा) राजोल संजय पाटील, घाटकोपर विधानसभा भाजपाचे महामंत्री श्री  अजय बागल यांच्यासह अनेक मान्यवर, स्वस्वरूप सांप्रदायाचे मुंबईपिठाचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक अनेक मान्यवर उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE