MSRTC | सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांसाठी लवकरच मिनी बस सेवा सुरु होणार!

मुंबई : पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गच्या भेटीवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी लवकरच राज्य परिवहन महामंडळाकडून मिनी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

या संदर्भात राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक भिमणवार यांच्याशी गुरुवारी चर्चा केली.  या मागणीला भिमणवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिनी एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत  विधानभवनात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांच्याशी ना. राणे यांनी बैठक घेऊन चर्चा केली.पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणे तातडीची गरज असल्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्ह्यातील काही बसस्थानके दुरवस्थेत असल्याचे ही अधिकाऱ्यांच्या ना. राणे यांनी निदर्शनास आणून दिले. त्या बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री या नात्याने राणे यांनी दिल्या. गावा गावांचा संपर्क वाढविण्यासाठी बसेच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना करताना रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तत्काळ भरण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE