MSRTC| रत्नागिरीसाठी नव्या आरामदायी २२ लाल परी बसेस दाखल

  • नव्या गाड्या अधिक आरामदायी
  • महिलांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी आज एकूण २२ नवीन आरामदायी एस.टी. बसगाड्या दाखल झाल्या. या बस सेवेचे लोकार्पण महिलांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.  उदय सामंत यांच्या हस्ते नव्या लाल परी गाड्यांचे लोकार्पण झाले

या नवीन बसगाड्यांमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी ३० नवीन बसगाड्या लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि सुरक्षित होईल.

डॉ. उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी.

लोकार्पण सोहळ्यानंतर नव्याने दाखल झालेल्या एस.टी. बसमधून पालकमंत्र्यांनी  प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

लांजा व राजापूर डेपोमध्ये दाखल होणाऱ्या बसचे लोकार्पण राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, स्थानिक जनप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने एस.टी. प्रवासी उपस्थित होते.

या बसगाड्यांचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे :

दापोली डेपो – १० बस
रत्नागिरी डेपो – ५ बस
लांजा डेपो – ३ बस
राजापूर डेपो – ४ बस

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE