- मिहीर महाजन यांनी मानले महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे आभार
मुंबई : दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दापोलीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, मिहीर महाजन यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.
केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत गोवा किल्ला- सुवर्णदुर्ग किल्ला हा रोपवे घेण्यात आला असून, केंद्र सरकारचे NHLM आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग या रोपवेचे काम कार्यान्वित करणार असल्याचा शासन निर्णय दि. १९ मार्च रोजी झाला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या आणि सरखेल कान्होजी आंग्रेंचे जन्मस्थान असणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे झाल्याने दापोलीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील महत्व अधोरेखित होणार आहे.
विशेषत्वाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळणार असून दापोलीचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश दादांच्या नेतृत्वात हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्याची खात्री आहे, असे श्री. महाजन यांनी म्हटले आहे.
