उरण (विठ्ठल ममताबादे) : काँग्रेसच्या कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक महिला कार्यकर्त्या ॲड. श्रद्धा ठाकूर यांनी गेली ९ वर्षे काँग्रेसचे काम उत्तम प्रकारे केले. त्यांनी तळागाळातील अनेक महिला काँग्रेस पक्षाशी जोडल्या त्यांचे काम चांगले आहे पण त्यांनी सांगितले की, मला आता महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून मुक्त करा, नवीन पदाधिकाऱ्याला संधी द्या, त्यामुळे त्याची दखल काँग्रेस पक्षाने घेतली. त्यांच्या उत्तम कामाची दखल घेऊन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी त्यांना शाल, श्रीफल, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी महिला नवीन अध्यक्ष पदासाठी सर्वानुमते श्रीमती रेखा घरत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती रायगड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांना कळविले आहे. त्यांना लवकरच नियुक्तीचे अधिकृत पत्र देण्यात येईल असे सांगण्यात आले.
