मुख्याध्यापक राजेश म्हात्रे यांचा ‘आदर्श शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मान

मुंबई : माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलडाणा यांच्या वतीने राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे B.P.E.S शाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री राजेश चंद्रकांत म्हात्रे यांना ‘आदर्श शिक्षक रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

मु. हाळ, तालुका रोहा जि. रायगडचे मूळ रहिवासी असणारे श्री. राजेश चंद्रकांत म्हात्रे हे सध्या दिवा ठाणे येथे राहत असून बी.पी.ई. सोसायटीची प्राथमिक शाळा बांद्रा पश्चिम मुंबई या शाळेवर प्राथमिक विभागात गेली १५ वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वंचित घटकातील ,झोपडपट्टीत व रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून विद्यार्थांसाठी केलेले उल्लेखनीय कार्य व राबविलेले नवोपक्रम आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेली लक्षणीय शैक्षणिक प्रगती आणि त्यांचे सामजिक कार्य यामुळे त्यांना या अगोदरही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च असा सन 2022-23 महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, इंटरनॅशनल ह्युमन राइट्स या संस्थेद्वारे “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मेमोरियल आदर्श शिक्षक पुरस्कार” व सुपर माईंड प्रकाशन पुणे या संस्थेद्वारे “नवोन्मेश ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE