विजांच्या कडकडाटासह रत्नागिरीत अवकाळी पाऊस; वीज गायब

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरीसह जिल्ह्याच्या विविध भागात गुरुवारी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस झाला.

मागील काही दिवसांपासून वातावरण बदलले असून आंबा बागायतदार धास्तावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. गुरुवारी पहाटे देखील रत्नागिरी शहर परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. पहाटेच्या सुमारास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी शहर परिसरात पाण्याची डबकी साचलेली पाहायला मिळाली

विजांच्या जोरदार कडकडाटामुळे गुरुवारी पहाटे रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत तो सुरू झालेल्या नव्हता. यामुळे ग्राहकांना गैरसळीचा सामना करावा लागला. विजय अभावी मोटर द्वारे पाणी चढवताना आल्याने नागरिकांची पाण्यासाठी देखील व्यवसाय झाली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE