Konkan Railway | सात राज्यांमधून धावणारी विशेष गाडी जाणार कोकणातून!

रत्नागिरी : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने दक्षिण रेल्वेशी समन्वय साधून तामिळनाडूमधील इरोड जंक्शन ते राजस्थानमधील बारमेर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०२५ पासून या गाड्या सुरू होणार आहेत. ही विशेष गाडी एकूण सात राज्यांमधून धावणार आहे.

  • गाडी क्रमांक ०६०९७: इरोड जंक्शन-बारमेर साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी दर मंगळवारी सकाळी ६:२० वाजता एर्नाकुलम जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी बारमेरला पहाटे ४:३० वाजता पोहोचेल. ही गाडी ८ एप्रिल २०२५ ते १० जून २०२५ दरम्यान धावणार आहे.
  • गाडी क्रमांक ०६०९८: बारमेर-इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी दर शुक्रवारी रात्री १०:५० वाजता बारमेर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी इरोड जंक्शनला रात्री ८:१५ वाजता पोहोचेल. ही गाडी ११ एप्रिल २०२५ ते १३ जून २०२५ दरम्यान धावणार आहे.
    विशेष गाडीचे थांबे :
    या गाड्या तिरुपूर, पोदनूर जंक्शन, पालक्काड, शोरनूर जंक्शन, तिरूर, कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळुरू जंक्शन, उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बायंदूर (एच), भटकळ, मुरुडेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार, मडगाव जंक्शन, करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, भरुच जंक्शन, वडोदरा जंक्शन, नडियाद जंक्शन, साबरमती, भिल्डी जंक्शन, राणीवारा, मारवाड भिनमाल, मोद्रान, जालोर, मोकलसर, समधडी जंक्शन, बालोतरा जंक्शन आणि बायतू स्थानकांवर थांबेल.
    डब्यांची रचना :  या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये एकूण २२ डबे असतील, ज्यात ३ टायर एसीचे २ डबे, स्लीपरचे १४ डबे, जनरलचे ४ डबे आणि एसएलआरचे २ डबे असतील.
  • हे सुद्धा वाचा Konkan Railway : तीन एक्सप्रेस गाड्या ठाणे, दादरपर्यंत
    Konkan Railway |  आठ रेल्वे स्थानकांवर उभारणार विशेष अतिथी कक्ष!
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE