आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी संघटना पदाधिकाऱ्यांना घडविली लंडन वारी!

उरण (विठ्ठल ममताबादे ) : आय टी एफ लंडन या बहुराष्ट्रीय कामगार संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह बोर्ड कमिटीची लंडन येथे ९ ते ११ एप्रिल दरम्यान  बैठक होती. एक्झिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत उपस्थित होते.

लंडन येथे आय टी एफ चे मुख्य कार्यालय असून कार्यालयाचे कामकाज कशाप्रकारे चालते त्याचबरोबर जागतिक पातळीवर कामगार हिताचे निर्णय याच बैठकीत पारित होत असतात. एक्झिक्युटिव बोर्ड मेंबर म्हणून असणारे महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कामगार संघटनेचे पदाधिकारी व सहकार्यांना आयटीएफ लंडनचे मुख्यालय व तिथे चालणारे कामकाज हे पाहण्याकरता स्वखर्चाने सर्वांना लंडन वारी घडविली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE