मुंबई जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या गुंतवणूक परिषदेमध्ये विविध उद्योगांच्या माध्यमातून सुमारे २०,५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

उद्योग विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या परिषदेच्या माध्यमातून यशस्वीतेने राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आलेली गुंतवणूक ही माझ्या उद्योग विभागाने राबविलेला उपक्रम यशस्वी झाल्याचा मला अभिमान आहे. देशातलं सर्वात उत्कृष्ट पायाभूत सुविधा देणार महाराष्ट्र राज्य असून उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्राला आहे हे उद्योग विभागाच यश आहे. सामाजिक उपक्रमांमध्येही उद्योग विभाग चांगलं काम करत आहे आणि यापुढेही राज्याच्या प्रगतीमध्ये उद्योग विभाग कायम अग्रेसर राहील असे आश्वासन यावेळी दिले.
