Big Update | रत्नागिरीतील २० पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित

रत्नागिरी : काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या हल्ल्या नंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातून पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये रत्नागिरीतील तब्बल वीस जण असल्याची माहिती पुढे आली आहे. हे सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे उदय सामंत यांनी रत्नागिरीतून जम्मू काश्मीरला गेलेल्या पर्यटकांची साधला संवाद साधला.

रत्नागिरी येथून कुणाल देसाई आणि त्यांच्यासोबत वीसजण श्रीनगरमध्ये गेले आहेत. कुणाल देसाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे व्यवसाय उपचार तज्ञ आहेत.

कुणाल देसाई यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करणारे कर्मचारी देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या सुखरूप असण्याची बातमी आल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

   
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE