रत्नागिरी : बेदरकारपणे एसटी बस चालवून शहरात चर्मालय येथे दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी एसटी बसचालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना ११ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली होती. जैनुद्दीन महमदसाहब शेख (४२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी बसचालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल उमेश पवार यांनी तक्रार दिली. याबाबत २३ एप्रिल रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातातील जखमी राहुल सुरेश तेरवणकर (३६) ११ मार्च रोजी दुचाकीवरुन (एमएच-०८-एसी-५६५८) परटवणे ते साळवी स्टॉप असे जात होता . त्याच सुमारास संशयित जैनुद्दीन शेख एसटी बस (एमएच-१४-बीटी-४४६१) घेऊन मजगावकडून येत होता. ही दोन्ही वाहने चर्मालय चार रस्त्यावर आली असता एसटी बसची राहुलच्या दुचाकीला डाव्या बाजुला धडक देत अपघात केला.
