लंडनमधील क्रिकेट स्पर्धेसाठी अविराज गावडे याला एमसीए उपाध्यक्ष आ. किरण सामंत यांच्याकडून शुभेच्छा

  • रत्नागिरीचा क्रिकेटपटू अविराज गावडे याची लंडनमध्ये होणाऱ्या कौन्टी व प्रीमियर क्रिकेट लीगसाठी निवड

रत्नागिरी : लंडनमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी अविराजला खास शुभेच्छा दिल्या आणि अविराजच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

लंडनमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या अविराज गावडे याचा सत्कार करून शुभेच्छा देताना आमदार किरण सामंत सोबत अविराज गावडे यांचे वडील अनिल गावडे.

रत्नागिरीचा उदयोन्मुख क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याची लंडनमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कौन्टी क्रिकेट स्पर्धा आणि प्रीमियर क्रिकेट लीगसाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून अविराजवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

अविराज गावडे याची निवड इंग्लंडच्या मिडलसेक्स संघाकडून करण्यात आली असून, तो दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. लंडनमध्ये होणाऱ्या या स्पर्धा युरोपातील सर्वात प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहेत. खास म्हणजे, कौन्टी क्रिकेट स्पर्धा ही युरोपियन देशांच्या संघ निवडीसाठी सिलेक्शन टूर्नामेंट म्हणून ओळखली जाते.

१० मे ते ६ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या चार महिन्यांच्या दौऱ्यात अविराज एकूण ३० सामने खेळणार आहे – त्यात १६ मॅचेस कौन्टी क्रिकेट स्पर्धेत आणि १४ मॅचेस प्रीमियर लीगमध्ये असतील.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE