- कोकण प्रवाशांना मोठा दिलासा!
रत्नागिरी : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई CSMT ते मडगाव जंक्शन दरम्यान एक विशेष ‘वन वे’ रेल्वे (गाडी क्रमांक ०११७१) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणवासीयांसाठी तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.
गाडी क्रमांक ०११७१: वेळापत्रक आणि थांबे
०११७१ मुंबई CSMT – मडगाव जंक्शन वन वे स्पेशल ही गाडी मुंबई CSMT येथून १४ जून २०२५ रोजी सकाळी ०७:३५ वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री २२:३० वाजता ती मडगाव जंक्शनला पोहोचेल.
या विशेष गाडीचे थांबे खालीलप्रमाणे असतील
- दादर
- ठाणे
- पनवेल
- रोहा
- माणगाव
- वीर
- खेड
- चिपळूण
- सावर्डा
- आरवली रोड
- संगमेश्वर रोड
- रत्नागिरी
- आडवली
- विलवडे
- राजापूर रोड
- वैभववाडी रोड
- नांदगाव रोड
- कणकवली
- सिंधुदुर्ग
- कुडाळ
- सावंतवाडी रोड
- थिविम
- कर्मळी
- या गाडीला आधुनिक LHB डब्यांसह आरामदायक प्रवास:
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरामदायक प्रवासासाठी या विशेष गाडीत एकूण १६ एलएचबी (LHB) डबे असतील. यात एक विस्टा डोम (Vista Dome) कोचचाही समावेश आहे, ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य कोकण आणि गोव्याच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येईल. याव्यतिरिक्त, ०३ चेअर कार (Chair Car) डबे आणि १० सेकंड सीटिंग (Second Seating) डबे असतील. तसेच, एक एसएलआर (SLR) आणि एक जनरेटर कार (Generator Car) उपलब्ध असेल.
