रत्नागिरी : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. फाटक हायस्कूलचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १२ विद्यार्थी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १८ असे एकूण २९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्कॉलरशिप निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला ४० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. जिल्हा गुणवत्ता यादीत मुमुक्षा वझे २६२ गुण- ३ री, मेघना मलुष्टे २५८ गुण -६ वी, गार्गी देवल २५६ गुण- ९ वी, स्पृहा भावे २४६ गुण – २० वी, सुयश गराटे २३८ गुण – २८ वा, ध्रुव बुरोडंकर २३४ गुण – ३६ वा, मिहीर खाडिलकर २३२ गुण – ४१ वा, शुभ्रा आंबेकर २२८ गुण – ४८ वी, चैतन्य भालेकर २२६ गुण – ५५ वा, दुर्वा मुरुडकर २२२ गुण – ६९ वी, श्रीवेद सनगरे २१० गुण – १०० वा आणि आराध्य महाडिक २०६ गुण – ११० वा यांनी उज्ज्वल यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. त्यांना परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्यासह प्रकाश कदम आणि गीताली शिवलकर यांनी मार्गदर्शन केले. जून पासून नियमित स्कॉलरशिपच्या जादा तासिका आणि डिसेंबरनंतर परीक्षा मंडळाचे आणि सराव परीक्षेचे मिळून ३५ पेपर सेट विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आले. याचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा झाला.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला ५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. जिल्हा गुणवत्ता यादीत नील देशपांडे २६० गुण – ९ वा, आर्य दांडेकर २५४ गुण – १५ वा, प्राप्ती अनुसे २४४ गुण – २० वी, श्रेया मोरे २३२ गुण – ३२ वी, वेदश्री चिले २३० गुण – ३६ वी, सिद्धी मोडक २२८ – गुण ३८ वी, अवनी परांजपे २२४ गुण – ४२ वी, रुद्र घडशी २२४ गुण – ४४ वा, श्लोक मोरे २२४ गुण – ४६ वा, कल्याणी चव्हाण २२२ गुण – ४७ वी, चिन्मय फडके २१८ गुण – ५५ वी, चैत्राली खानविलकर २१२ गुण – ६९ वी, मोहित टिकेकर २१२ गुण – ७१ वा, वीर कांबळी २१२ गुण – ७४ वा, सर्वेश गोठणकर २१० गुण- ७५ वा, ईश्वरी खाडीलकर २१० गुण – ७६ वी, तपस्या बोरकर २०६ गुण – ८२ वी यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावत ‘जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणारी शाळा’ असा फाटक हायस्कूलचा नावलौकिक कायम राखला आहे.
या विद्यार्थ्यांना अनिल आग्रे, प्रीती हातिसकर, इंद्रसिंग वळवी, निवेदिता कोपरकर यांच्यासह शिक्षण संस्थेच्या सीईओ दाक्षायणी बोपर्डीकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या जादा तासिका एप्रिलपासून सुरू केल्या जातात, ही शाळेची विशेष बाब आहे. शिष्यवृत्ती परीक्षांच्या मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह एकूण ५० पेपर विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आले. सराव परीक्षेनंतर चर्चासत्र, शंका निरसन, विषय शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे विशेष सहकार्य यामुळे विद्यार्थी यश संपादन करू शकले.
मागील वर्षी आठ विद्यार्थ्यांसह दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले होते. एन. एम.एम. परीक्षेत शाळेच्या आठ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून एका विद्यार्थ्याला सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्षा ॲड. सुमिता भावे, सेक्रेटरी दिलीप भातडे, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक व पालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.














