चाणजे येथे चारसूत्र पद्धतीने भात लागवड

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) :  दिनांक २१ जुलै २०२५ रोजी मौजे. चाणजे, तालुका उरण येथे श्रीम.भरती उमेश म्हात्रे यांच्या शेतावर श्रीम.अर्चना सुळ नारनवर तालुका कृषी अधिकारी उरण यांनी शेतात उतरून आत्मा अंतर्गत रत्नागिरी ८ या वाणाचे चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली.

यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवड पद्धतीमुळे लागणारा खर्च बचत, उत्पादन वाढ तसेच चारसूत्री भात लागवडीच्या प्रत्येक सूत्रांबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी अधिकारी गटकळ, मकृअ, श्रीम.बुरकुल, उप कृ अधिकारी श्रीम. अदीका पानसरे, स.कृ.अधिकारी श्रीम. नमिता वाकळे, बी. टी. एम उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE