जहांगीर कलादालनात मान्सून प्रदर्शनासाठी सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांची निवड

संगमेश्वर : देशातील नामवंत जहांगीर कलादालन याची स्थापना १९५२ साली झाली असून आज ७० वर्षांनी देखील हे कलादालन नवोदित कलाविद्यार्थ्यांना जगासमोर प्रदर्शित करण्याची परंपरा अविरतपणे करत आहे.यासाठी हे कलादालन अनेक उपक्रम राबवित असते.दरवर्षी याठिकाणी मान्सून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात यामधून काही निवडक विद्यार्थी यात निवडून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात येते.हा त्या विद्यार्थ्यांसाठी व कलामहाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट असते. यावर्षी घेण्यात आलेल्या ४२ व्या मान्सून शो साठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ सावर्डे या चित्र -शिल्प  कलामहाविद्यालयातील  ऋतिक रविंद्र शिरकर,संकेत उत्तम कदम ,साक्षी मोरे , श्रीनाथ मांडवकर , तुषार पांचाळ  या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.             विद्यार्थी आपल्या या यशाचे श्रेय कलामहाविद्यालयास देत आहेत. तसेच  यशस्वी विद्यार्थ्यांचे  सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, सकूल कमिटी सर्व सदस्य,कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. 
चौकट
जहांगीर कलादालना मध्ये आम्हांला आमची कला प्रदर्शित करण्याची संधी मिळणे ही बाब आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असून यामुळे आमची कला असंख्य कलारसिकांसमोर जाणार आहे . सह्याद्री कला महाविद्यालयात कला विषयक जे विविध उपक्रम होतात त्यामधून आम्हांला नवनवीन कल्पना सुचतात आणि सुप्त कलेला अधिक वाव मिळतो असे मत जहांगीर मधील कला प्रदर्शनासाठी कलाकृतीची निवड झालेल्या श्रीनाथ मांडवकर याने व्यक्त केले . सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव , प्रा . रुपेश सुर्वे , अमित सुर्वे , प्रदीपकुमार देडगे , अवधूत खातू , विक्रांत बोथरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे संकेत कदम याने सांगितले . 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE