संततधार पावसामुळे खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

खेड-चिपळूण दरम्यान महामार्गावर दरड कोसळली महामार्गवरील वाहतूक पर्यायी चिरणीमार्ग

चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल

चिपळूण : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या वर्षीचा महापुराचा अनुभव लक्षात घेत या वेळी खबरदारी म्हणून चिपळूणमध्ये एनडीआरएफची तुकडी दाखल झाली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार दि. ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खेड -चिपळूण दरम्यानच्या परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळल्यामुळे वाहतूक पर्यायी चिरणी मार्गाने वळवावी लागली आहे.

गेल्या वर्षी चिपळूण तसेच खेडमध्ये महापुराने हाहा:कार माजवला होता. गेल्या काही तासांपासून चिपळूण आणि खेडमध्ये नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पुण्याहून एनडीआरएफची तुकडी दाखल झाली आहे.
सोमवारी सकाळीच चिपळूणमध्ये राष्ट्रीय आपत्ती बचाव व सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहे.

खेडमध्ये जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून पुराचे पाणी शहरात घुसू लागले आहेत. यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना पुराचे पाणी शिरले या भागातून ये-जा करण्यासाठी होडीचा वापर करावा लागत आहे. चिपळूण खेडसह संगमेश्वरमध्ये आरवली, माखजन, रत्नागिरीमध्ये चांदेराई भागातून वाहणाऱ्या नद्यांची पातळी वाढल्याने सखल भागात पाणी साचले आहे. खबरदारी म्हणून चांदेराई येथील बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांनी आपल्या सामानाची सुरक्षित स्थळी हलवाहलव करण्यास सुरुवात केली आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र )
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE