‘
रत्नागिरी : हिंदू संस्कृतीची परंपरा जपत प्रत्येक सण आणि उत्सव आनंदाने साजरा करणाऱ्या जी.जी.पी.एस च्या ‘श्री स्वामी स्वरूपानंद प्री-प्रायमरी’ विभागाने आपल्या चिमुकल्यांसोबत विठ्ठलाच्या जयघोषात
आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.
आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूरला रवाना झाले आहेत; तसेच जी.जी.पी.एस चे छोटे भाविक सुद्धा वारकरी बनून दिंडीसाठी तयार झाले होते. विठ्ठल- रखुमाईच्या वेशभूषेतील छोटे वारकरी हातात टाळ घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते.जणू अलंकापुरी अर्थात पंढरपूर शाळेत अवतरले होते.


विठ्ठलाची विधिवत पूजा झाल्यानंतर मुलींनी विठ्ठल नामाचा ठेका धरत फेर धरला,फुगड्या घातल्या.
प्री-प्रायमरी विभागाच्या सविता वझे मॅडम आणि शुभदा पटवर्धन मॅडम तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विठू माऊलीचा हा सोहळा उत्साहात पार पडला.
