राष्ट्रपती निवडणूक २०२२; महाराष्ट्रासाठीची मतपेटी स्वीकारुन अधिकाऱ्यांचे पथक मुंबईकडे रवाना

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी मतपेटी व इतर साहित्यांचे नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे वाटप सुरु केले आहे. महाराष्ट्रासाठीची मतपेटी व इतर साहित्य राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी स्वीकारले.

यावेळी उपमुख्य निवडणूक अधिकारी शोभा बोरकर, विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव सुहास नलावडे यांच्या उपस्थितीत ही सामुग्री स्वीकारण्यात आली असून अधिकाऱ्यांचे हे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE