संगमेश्वर : धामणी येथील प्रसिद्ध मूर्तिकार शिवाजी लिंगायत यांचें वयाच्या ९० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आण्णा या नावाने ओळखले जात होते
वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी मूर्तीकाम करायला सुरुवात केली. पोस्टमन म्हणून त्यांनी काम केले आहे. देवाला घडवणारे आण्णा आज मात्र देवा घरी गेले, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अण्णांच्या जाण्याने कुटुंबावर तसेच गावावर शोककळा पसरली आहे.
शिवाजी लिंगायत यांच्या पश्चात तिनं मुलगे,सुना, नातवंडे असा परिवार आहे

