परिवारातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
उरण दि २२(विठ्ठल ममताबादे ): शुक्रवार दि. २२ जुलै २०२२ रोजी ठीक सकाळी ११.३० वाजता कर्मवीर भाऊराव पाटील शाळा खोपटे येथे खोपटे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ता गोरख रामदास ठाकूर आणि मित्र परिवार ह्यांच्या मार्फत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करण्यात आले तसेच वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
उरण पूर्व विभागात वीज खूप मोठ्या प्रमाणात खंडित होत असते व त्याचा त्रास पूर्व विभागातील लोकांना होत असतो. परंतु हा त्रास कमी करण्याचे काम हे MSEB चे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचा काम करत असतात. अशा मेहनती वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.सहाय्यक अभियंता प्रथमेश मयेकर आणि टीमचा शाल श्रीफळ, भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आर्थिक मदत करण्यात आलेले विद्यार्थी हे १० वी व १२ वी मध्ये पहिले दुसरे आलेले आहेत त्यांना १० वी व १२ वी ला ७५ ते ९०% मार्क मिळालेले आहेत.परंतु घरची आर्थिक परिस्थिती ही उच्च शिक्षण घेण्यासारखी नसल्या कारणाने त्यांना गोरख ठाकूर व मित्र परिवाराकडून छोट्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली आहे. कु. तृप्ती चिंतामण पाटील, सुजल रमाकांत म्हात्रे, चैतन्य कैलास घरत आणि सोहम जगजीवन पाटील या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी राजन पाटील ( चेअरमन स्कुल कमिटी खोपटे), प्रथमेश मयेकर ( सहाय्यक अभियंता MSEB ) आणि त्यांचे सहकारी, जयेशा ठाकूर ( माता पालक संघटना), म्हात्रे मॅडम, भोईर सर, कोमल पाटील, भुपेंद्र ठाकूर, खुशाल घरत, विनोद पाटील, तेजस भगत व इतर मान्यवर उपस्थित होते.




