गणेशोत्सवाला महागाईची झळ

‘जीएसटी’मुळे मूर्तींच्या दरात २० टक्के वाढ

उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : गणेश मूर्तीच्या कच्च्या मालावर असलेल्या जीएसटीमुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पीओपीच्या दरात सुमारे ४० ते ५० टक्के वाढ झाल्याने गणेश मूर्तींच्या दरात सुमारे २० टक्के वाढ करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी जगभरामध्ये कोरोना महामारी या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला. यातून सर्वांचे जनजीवन ठप्प झालं. भारतात देखील निर्बंध लावण्यात आले. यामुळे सर्व सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच धर्मीय सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. ऑगस्ट महिन्यात 31 तारखेपासून सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मात्र, वाढत्या महागाई मध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती २० टक्क्यांनी महागलेल्या आहेत.असे माहिती मूर्तिकार भालचंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.

उरणच्या बाझारपेठेत सुंदर सुबक अशा गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. गणेश मूर्ती घेण्यासाठी नागरिकांची भरपूर गर्दीही होत आहे. अनेक गणेश भक्तांनी अगोदरच आपली गणेश मूर्ती बुकिंग करून ठेवली आहे. मात्र यंदा पीओपीच्या गणेश मूर्तीच्या दरात २०% वाढ झाल्याने त्याचा फटका गणेश भक्तांना, ग्राहकांना बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.श्री राज नगर अपार्टमेंट,कामठा रोड, गाडे हॉस्पिटल जवळ उरण शहर येथे सुप्रिया गणेश चित्रशाळेत पेणच्या मातीच्या व प्लास्टरच्या सुंदर व सुबक गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविक भक्त गर्दी करत आहेत.त्यामुळे भाववाढ किंवा दरवाढ झाले तरी गणेश भक्तांचा कल गणेश मूर्ती घेण्याकडेच व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याकडेच असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकारांची ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. देशातील व राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे गणेश भक्तांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE