घरोघरी तिरंगा जनजागृतीसाठी दापोलीत उद्या सायकल फेरी

दापोली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त भारत सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. या अभियानाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचं आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी ७ ऑगस्ट २०२२ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती एसटी स्टँड- पोलीस स्टेशन – बाजारपेठ- पंचायत समिती- नगर पंचायत- एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक- पांगारवाडी- जालगाव ग्रामपंचायत- आझाद मैदान अशी ७ किमीची असेल. समारोप ९:३० वाजता आझाद मैदान येथे होईल. यामध्ये काही शासकीय अधिकारी सायकल चालवत सहभागी होणार आहेत. सायकलफेरीमधील सायकलना तिरंगा लावण्यात येईल.

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ९६३७९२०९२०, ९६७३७५०५५८, ९०२२८७४८८१ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सर्वांसाठी सायकल फेरी आयोजित केली जाते. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE