सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील रानसई वाडीतील रा .जि. प. शाळा रानसई आदिवासी वाडीतील विदयार्थ्यांना इयत्ता पहिली ते चौथी मुला-मुलींना शालेय वस्तूंचे वाटप व आयडी कार्डवाटप खोपटे(बांधपाडा ) गावातील सुधाकर केशव ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारती सुधाकर ठाकूर,निकिता तेजस ठाकूर तसेच रानसई गावातील आदिवासी रा .जि. प. शाळेतील शिक्षिका जान्हवी कडू आणि सुनीता म्हात्रे, गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.विशेष म्हणजे निकिता तेजस ठाकूर या स्वतः मेकपचा व्यवसाय करत असून वर्ष भरात त्यांना मिळालेला आर्थिक लाभाचा सदुपयोग समाजपयोगी कार्यक्रमासाठी लागावा या उद्देशाने त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या सासू सासऱ्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम राबवून समाजापूढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE