गरीबांना मोफत धान्य डिसेंबरपर्यंत मिळणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली तीन महिन्यांची मुदतवाढ


नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यामुळे देशातील गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत देशातील सुमारे ८० टक्के लोकांना तांदूळ किंवा गहू मोफत दिला जातो.

आधी जाहीर केलेल्या घोषणेनुसार ही योजना सप्टेंबर २०२२ पर्यंत चालवली जाणार होती. मात्र आता तिला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने डिसेंबरपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य पुरवले जाणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE