कोमसापतर्फे उरण जीवनगौरव समारंभ उत्साहात संपन्न

उरण (विठ्ठल ममताबादे) : कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप ),मधुबनकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने उरण जीवनगौरव पुरस्कार आणि कविसंमेलन समारंभ उरण शहरातील विमला तलाव(गार्डन )येथे ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील, रामचंद्र म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.भरत पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कविसंमेलनात मच्छिंद्र  म्हात्रे,संग्राम तोगरे,रामचंद्र म्हात्रे,नामदेव बरतोड,प्रा.एल.बी.

पाटील, भगवान पोसू, अरुण म्हात्रे इत्यादी कवीनी सहभाग घेतला.

उरणातील ज्येष्ठ नागरिक बाळाराम म्हात्रे,चंद्रकांत मुकादम, ज्येष्ठ कवी अर्जुन हंडोरे ,धनंजय गोंधळी,संग्राम तोगरे,ना.शं.पाटील 

यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच नृत्य कलाविष्कारात
उरणचे नाव देशात मोठे करणारे स्वर्गीय नितीन पाटील यांना मरणोत्तर जीवनगौरव सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला उरण शहरातील विमला तलाव (गार्डन) येथे कोकण मराठी साहित्य परिषद व मधुबन कट्टा या साहित्य क्षेत्रातील संस्थेमार्फत कवी संमेलन भरविले जाते. या कविसंमेलनाला जनतेचा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE