माखजन येथील ग्रामस्थांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातून पश्चिम महाराष्ट्र व पर राज्यात राजरोस व अवैधपणे होणारी गोवंश वाहतूक वेळोवेळी संगमेश्वर पोलिसांकडे तक्रारी करूनही बंद होत नाही. तरी ती त्वरीत बंद करावी अन्यथा आम्हाला कायदा हातात घेवून ती रोखावी लागेल, असा इशारा माखजन परिसरातील नागरीकांच्या वतीने शिवसेनेचे युवा पदाधिकारी स्वप्निल बापट व सचिन चव्हाण यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाव्दारे दिला आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे गोवंश बंदी असताना संगमेश्वर तालुक्यातून रात्री अपरात्री गोवंश अवैधपणे व बेकायदेशीर
वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्यात येत असून संगमेश्वर तालुक्यात अनेकवेळा अशी होणारी वाहतूक अनेकवेळा अडविली होती. तरीही संगमेश्वर पोलिस याकडे दुर्लक्ष करीत असून त्यावर कोणती ही कारवाई होत नाही असे का? असा भेदभाव होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांना निवेदन व तक्रारी करूनहि बंद होत नसल्याने निवेदनात नाराजी व्यक्त केली आहे.
तरी या भागात होणारी अवैध गोवंश वाहतुक आम्ही अडवल्यास शांतता भंग होवून नाहक वाद निर्माण होवून वातावरण बिघडू शकते, असे होवू नये यासाठी अशी कत्तलीसाठी जाणारी अवैध गोवंश वाहतूक त्वरि lत थांबविण्यात यावी अशी, मागणी माखजन ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक यांना निवेदनाव्दारे केली आहे.















