अशा लाल मातीत जन्मास यावे
जिचा रंग रक्तास दे चेतना
इथे सागराच्या अमर्याद सीमा
क्षितिजास पालाण मी घालितो
रत्नागिरी : परशुरामांच्या बाणाच्या निर्मितीतून तयार झालेलं कोकण की जे नैसर्गिक सृष्टी सौंदर्याने नटलेलं आहे. खरंतर त्याला पृथ्वीवरचा स्वर्ग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यांमध्ये वसलेली ही छोटी गावं आणि अथांग अशा समुद्राचा किनारा लाभलेल्या या कोकणच्या सृष्टीसौंदर्याचे वर्णन आपण कधीच करू शकत नाही. अशाच कोकणातील सौंदर्यानं नटलेल्या गावांचा इतिहास आणि त्यांची संपूर्ण माहिती देणारा असा दिवाळी अंक ‘सुंदर गावे कोकणची’ प्रत्येकाने स्वतःजवळ जपून ठेवावा, असा आहे.
हा केवळ अंक नव्हेच तर वाचकांनी आपल्या घरात कायम जतन करावा, असं छापील वर्णन…अर्थात सुंदर कागदावर रंगीत छपाईतून निर्मित झालेला आणि कोकणच्या माहित नसलेल्या अशा माहितीची आपल्याला जाणीव करून देणारा परंपरांचा इतिहास सांगणारा भौगोलिक परिस्थितीचं वास्तव दर्शन देणारा असा एक अद्वितीय असा ठेवाच म्हणावा लागेल.
‘सुंदर गावे कोकणची’ हा अंक महाराष्ट्रात कुठेही मिळण्यासाठी +918999147082 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.















