मनसेच्या माध्यमातून जोयाल इन्फ्रा आणि फ्रेड सर्व्हिसेसच्या कामगारांचा चार वर्षांचा करार यशस्वी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वामुळे कामगारांमध्ये आनंद

उरण (विठ्ठल ममताबादे ) : हिंदू जननायक राज ठाकरे व युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष डॉ.मनोज चव्हाण व सरचिटणीस संतोष भाई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील जे.एन.पी.टी (न्हावा शेवा) मधील मे. मेरिडियन ट्रेडप्लेस प्रा. लि. यांचा अंतर्गत मे. जोयाल इन्फ्रा आणि फ्रेड सर्व्हिसेस कंपनीतील कामगारांचा पुढील चार वर्षासाठीचा कामगार करार करण्यात आला. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

या प्रसंगी संयुक्त सरचिटणीस निशांत गायकवाड , जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर, उपाध्यक्ष परशुराम साळवे , उपचिटणीस सुनील आवारी हे उपस्थित होते.कामगारांनी राज साहेब ठाकरे व अमित ठाकरे यांचे आभार मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE