नाणीज, दि. ५ : श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून शिराळा (जि. सांगली) येथील कै. प्रकाश भाऊ खंडागळे यांचे मरणोतर देहादान करण्यात आले. संस्थानच्या पुढाकारातून हे ३० वे देहदान आहे.
कै. प्रकाश खंडागळे (वय ६०) यांचे काल निधन झाले. त्यांनी यापूर्वीच संस्थानकडे देहदान संकल्प अर्ज भरून दिला होता. काल त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे बंधू श्री. शिवाजीराव बापूसाहेब खंडागळे यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानशी संपर्क साधून कराड (जि. सातारा) च्या कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्स येथे आपल्या बंधुंचा देह सुपूर्द केला.
श्री शिवाजी बापूसाहेब खंडागळे (आण्णा ) व त्यांचे सर्व कटुंबीय यांचे संपूर्ण संप्रदयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. मृताच्या आत्म्यास शांती लाभो अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
यावेळी शिवाजीराव बापूसाहेब खंडागळे ( आण्णा ) व इतर सर्व नातेवाईक आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वश्री दिलीप सोमदे आप्पा, संजय थोरात, हर्षल जाधव, रामदास पाटील आप्पा, पांडुरंग मोरे, राजाराम मोरबळे जाधव व इतर भक्त गणांनी विशेष प्रयत्न करून वेळीच मारणोतर देह कृष्णा इन्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सकडे सुपूर्द केला. येथील अनोटॉमी विभागाच्या प्रमुख डॉ. जोशी मॅडम यांनी तो स्वीकारला. या उदात्त दानाबद्दल हॉस्पिटलनेही कुटूंबियांचे व संस्थांचे आभार मानले आहेत. तसे प्रमाणपत्रही दिले आहे.
दरम्यान जगद्गुरू नरेंदरचार्य महाराज संस्थांनाचा मरणोतर देहादान हा उपक्रम जनमाणसामध्ये यशस्वी होत आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी माणसाने मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन संप्रदायास केले होते. मृत्यूनंतर आपला देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना उपयोगी पडावा, अशी भावना व्यक्त केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो भक्तांनी असे अर्ज संस्थानकडे भरून दिले आहेत. सप्टेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०२२ या काळात जगद्गुरू महाराज संस्थानाने 30 मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले आहेत.

