
मादी कासवाने पाणी दिले 102 अंडी
वेळास : ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरवात झाली असून यंदाच्या हंगामातील पाहिले घरटे मंडणगड तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी आढळून आले. २०२२ या हंगामातील हे महाराष्ट्रातील पहिले घरटे आहे. या घरट्यात मादीने १०२ अंडी दिली असून ती संरक्षित करण्यात आली.
याबाबत परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबरला पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास वेळास समुद्रिकिनारी कासव मित्र देवेंद्र पाटील गस्त घालत असताना वाळूमध्ये हे पहिले घरटे आढळून आले. मागील २०२१ ला महाराष्ट्रातील पहिले घरटे रायगड जिल्ह्यातील दिवे आगरजवळील आरवी समुद्रकिनारी ११ डिसेंबर २०२१ ला मिळाले होते.
वेळास किनारी नोव्हेंबरमध्येच कासवांची चाहूल लागल्याने आनंदाचे वातावरण आहे. २०२१-२२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील समुद्रकिनारी एकूण १४ हॅचेरीमधून ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांचे संवर्धन करताना ३१७ घरट्यातून ३३ हजार ६०९ अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातून १२ हजार १४ इतकी पिल्ले समुद्रात यशस्वीपणे सोडण्यात आली.














