मुंबई -मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस सहा तास लटकली
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणारी आलिशान तेजस एक्सप्रेस आज दि. 25 नोव्हेंबरपासून विद्युत इंजिनसह धावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, विजेवरील पहिल्याच दिवसाच्या प्रवासात ही आलिशान गाडी रायगडमधील माणगाव स्थानकात येऊन रखडली. यामुळे रत्नागिरीसह कणकवली, गोव्याकडे जाणाऱ्या प्रवासी पर्यटकांचा सुमारे दीड तास खोळंबा झाला. सूत्रांच्या माहितीनुसार माणगाव ते वीर दरम्यान ओव्हर आणि विद्युत वाहिनीतील बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना फटका बसला. यामुळे डाऊन कोकणकन्या शुक्रवारी दुपारी पावणे बारा वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार तब्बल सहा तास दोन मिनिटे उशिराने धावत होती
तेजससह इतर दोन एक्सप्रेस गाड्या देखील विद्युत इंजिनसह चालवण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकिर्दीत देशातील पहिली तेजस एक्सप्रेस मध्य तसेच कोकण रेल्वेच्या अखत्यारीतील मुंबई सीएसएमटी ते करमाळी दरम्यान धावली. मोठ्या दिमाखात ही वातानुकलीत आलिशान गाडी कोकण रेल्वे मार्गावर मागील काही वर्षांपासून धावत आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्यांपाठोपाठ ऑगस्ट महिन्यापासून प्रवासी गाड्या देखील टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिन सह चालवल्या जात आहेत.
रेल्वेकडून प्राप्त ताज्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्ग लावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी विकली एक्सप्रेस (22115/2216), मुंबई सीएसएमटी ते मडगाव (22119/22120) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली (22113/22114) या गाड्या देखील आता विद्युत इंजिनचा धावणार आहेत.
यातील 22115/2216) ही ही एक्सप्रेस गाडी दिनांक 24 नोव्हेंबर पासून तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस दिनांक 25 नोव्हेंबर पासून विद्युत इंजिन सह धावू लागली आहे. मात्र दिनांक 25 नोव्हेंबर रोजी च्या विद्युत इंजिनसह पहिल्याच फेरीत तेजस एक्सप्रेस रायगड मधील माणगाव स्थानकात येऊन थांबली. डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिन जोडून होणाऱ्या तेजसच्या पहिल्याच प्रवासात ही गाडी रत्नागिरीत पोहोचायच्या वेळेपर्यंत रायगड मधील वीरस्थानकात होती.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान धावणारी तिसरी एक्सप्रेस गाडी दिनांक 26 नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे
















