विद्युत वाहिनीतील बिघाडामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

मांडवी, तेजस, जनशताब्दीसह चार एक्सप्रेस गाड्या विलंबाने चालवण्याची रेल्वेवर वेळ

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे रेल्वे स्थानका दरम्यान ओव्हर हेड विद्युत वाहिनीत (OHE) झालेल्या बिघाडामुळे शुक्रवारी कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले. यामुळे मांडवी, तेजस एक्सप्रेस तसेच जनशताब्दी एक्सप्रेससह चार गाड्या कोकण रेल्वेला विलंबित/ पुनर्निर्धारित वेळापत्रकानुसार चालवाव्या लागत आहेत.


या संदर्भात प्राप्त माहितीनुसार विन्हेरे तसेच दिवाणखवटी या सेक्शन मध्ये अलीकडेच पूर्ण झालेल्या विद्युतीकरणातील ओव्हर हेड विद्युत वाहिनीमध्ये अचानक बिघाड झाला. यामुळे याचवेळी कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अप तसेच डाऊन दिशाच्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. गुरुवारी रात्री मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटलेली आणि शुक्रवारी कोकण रेल्वे मार्गावर येणारी कोकणकन्या एक्सप्रेस जवळपास सहा तास उशिराने धावत होती.


विद्युत वाहिनीतील बिघाडामुळे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी धावणारी मुंबई सीएसएमटी ते मडगाव (10103) मांडवी एक्सप्रेस सकाळी सात दहा ऐवजी सकाळी 11:15 मिनिटांनी सुटली. मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी (11100 ) मडगाहून दुपारी 12:45 ऐवजी पुनर्निर्धारित वेळापत्रकानुसार सुमारे तीन तास विलंबाने म्हणजे दुपारी 3.30 वाजता वाजता सोडण्यात आली.
शुक्रवारची डाऊन जनशताब्दी मुंबईतून मडगावला येतानाच विलंबाने धावल्याने जनशताब्दी एक्सप्रेस मडगाव – मुंबई सीएसएमटी (12052) ही अब जनशताब्दी एक्सप्रेस तिच्या पूर्वनिर्धारित दोन वाजून 40 मिनिटां ऐवजी तुम्हारे सव्वा दोन तास विलंबाने म्हणजे म्हणजे सायंकाळी पाच वाजता मडगाव हुन मुंबई साठी सोडण्याचे नियोजन रेल्वेला करावे लागले.
OHE बिघाडाचा फटका बसल्याने शुक्रवारी डाऊन तेजससह मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणारी (22120) अप तेजस एक्सप्रेस देखील तिच्या पूर्व निर्धारित दुपारी 3.15 ऐवजी सुमारे सव्वा दोन तास सायंकाळी पाच तीस वाजता मडगाव येथून मुंबईसाठी सोडण्याचे सुधारित वेळापत्रक कोकण रेल्वेला जाहीर करावे लागले.


एकूणच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर झालेल्या बिघाडामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या विलंबाने धावत होत्या. काही दिवसापूर्वीच मुंबईत मध्य रेल्वेने घेतलेल्या रेल्वे ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्ग वर येणाऱ्या गाड्यांना फटका बसला होता.
हे दुष्टचक्र संपते न संपते तोच शुक्रवारी खेड तालुक्यातील दिवाणखवटी ते विन्हेरे दरम्यान ओव्हरहेड विद्युत वाहिनीत अचानक बिघाड झाल्यामुळे विलंबाने धावणारे अनेक गाड्यांमधील प्रवाशांचा खोळंबा झाला.
अखेर पहाटेच्या सुमारास झालेल्या बिघाडा संदर्भात कोकण रेल्वेने दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ट्विटर संदेशाद्वारे अधिकृत माहिती दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE