उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील खोपटे गावातील परेश धनंजय पाटील या युवकाने सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने उद्योगातून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर उपाययोजना करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आरसीओएनएफ, गोंडखैरी, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात श्री विश्व समर्थ व्हीलेज फाउंडेशनच्या वतीने २४ नोव्हेंबर २०२२ रोजी युवा माहिती तंत्रज्ञान उद्योजक या पुरस्काराने सडक परिवहन महामार्ग मंत्री, भारत सरकार नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्याचबरोबर या कार्यक्रमात डॉ. रवींद्र ठाकरे आयएएस एडिशनल ट्रीबल कमिशनर, नागपूर, डॉ. विजयराव गुघे राष्ट्रपती पुरस्कार विजेते २००७, पर्यावरण निसर्ग विज्ञान कार्यकर्ते डॉ.अजयसिंघ राजपूत आरसीओएनएफचे रिजिनल डायरेक्टर आदी दिग्गज मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परेश पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















