मुंबई-कन्याकुमारी विशेष एक्सप्रेसला खेड थांबा न दिल्यास आंदोलन

जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेकडून कोकण रेल्वेला इशारा

खेड : कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी दरम्यान जाहीर केलेल्या विशेष एक्सप्रेसला खेड थांबा देण्यात डावलण्यात आले आहे. या गाडीला खेड थांबा न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेमार्फत कोकण रेल्वेचे सीएमडी यांना आज (दि. 31 डिसेंबर) देण्यात आला आहे.

जल फाउंडेशनने आपल्या पत्रात म्हटलं आहे की, आम्ही मागील चार वर्षांहून अधिक काळ कोकण रेल्वेकडे कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करत आहोत. मात्र, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही तसेच आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. 

सध्या धावणाऱ्या अपुऱ्या गाड्या आणि वाढत्या प्रवासी संख्येमुळे पुढील गाड्यांना खेड येथे थांबा देण्याची मागणी जुनी आहे

१२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस

१२६१७ / १२६१८ मंगला एक्सप्रेस

२२११९ / २२१२० तेजस एक्सप्रेस

१२२०१ / १२२०२ गरीबरथ एक्सप्रेस

२२११५ / २२११६ लो.टि.ट.↔ करमळी एक्सप्रेस

२२११३ / २२११४ लो.टि.ट. ↔ कोचुवेली एक्सप्रेस

२२६३० तिरुनेलवेली → दादर एक्सप्रेस

१२१३४ मंगळुरु → मुंबई एक्सप्रेस

२२४७५ / २२४७६ हिसार ↔ कोईम्बतूर एक्सप्रेस

२०९३१ / २०९३२ इंदूर कोचुवेली एक्सप्रेस

  • ०१४६१ / ०१४६२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ↔ कन्याकुमारी विशेष एक्सप्रेस
  • ०१४६३ / ०१४६३ लोकमान्य टिळक टर्मिनस ↔ कन्याकुमारी विशेष एक्सप्रेस

खेड स्थानकासाठी या मागण्या केल्या जात असतानाही शुक्रवारी मुंबई कन्याकुमारी एक्सप्रेस सुरु करताना खेड थांबा दिलेला नाही. तरी, लवकरात लवकर पुढील मुंबई कन्याकुमारी एक्सप्रेसला खेड थांबा देण्यात यावा, असे जल फाउंडेशनने सीएमडींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी रविवारी येत असल्यामुळे सावंतवाडी दिवा, मांडवी, मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या नियमित गाड्यांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे, आमच्या मागणीचा तात्काळ विचार करावा अन्यथा नाईलाजाने आम्हाला या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा विचार देण्यात आला आहे.

जल फाउंडेशनने या पत्राच्या प्रती मा. श्री. एकनाथ शिंदे , मुख्यमंत्री, महाराष्ट्र, मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र, मा. श्री. सुनिल तटकरे, खासदार, रायगड, मा. श्री. योगेश कदम, आमदार, दापोली – खेड – मंडणगड यांना दिल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE